STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

नाते प्रेम........

नाते प्रेम........

1 min
212

गणगोत म्हणजे नातलग

ती आपलीच माणसं असतात

पण गरजेच्या वेळी हीच माणसं

कुठतरी गायब होवून बसतात....


जवळ असणारे त्यावेळी

खूप लांब हो तेव्हा जातात 

लांबचे मग तेव्हा आपल्याला

मदतीचा हात पुढे करतात......


काही गणगोत आपल्यासाठी

जीव ओवाळूनही टाकतात

ती खरचच मायेची माणसं 

प्रेमान धरून ठेवलेली असतात...


आपणही असे कोणाचेतरी

गणगोत मनापासून बनावे

ज्याने त्याने आपापले नाते

घट्ट दृढ करावे.....

घट्ट दृढ करावे.....



Rate this content
Log in