STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

नाते मैत्रीचे....!

नाते मैत्रीचे....!

1 min
376

नाते मैत्रीचे....!

दोन जिवलग मित्र

सदैव एकत्र राहू इच्छिणारे

पण

नशिबात फार कमी

वेळेला एकत्र येणारे....

प्रसंग कोणताही असो

यांचा सबंध ठरलेला

पण

प्रसंगाचे गांभीर्य

अबाधीत राहील याची खात्री नसलेला....

दुःखात सुद्धा

सुखाची पेरणी करणारा

पण

सुखाच्या क्षणी

उगाचच शंका निर्माण करणारा...

असे यांचे मैत्रीचे

वास्तव रूप गूढ असणारे

तरीही क्षणात

सारे रंग जीवनाचे दाखवणारे...

हेच ते दोघे

सदा अतूट बंधनात राहणारे

आणि कधीतरी

नाजूक क्षणी भेटणारे....

एक आसू आणि दुसरा हसू

पहा पहा यांचीं यारी

आहे कशी न्यारी

सर्वांना असते प्यारी

नर असो वा नारी...

आनंदात सदा

बिलगतात एकमेकांना

जेव्हां

डोळ्यात येतात आसू

तेंव्हा ते

गाली खुलवतात हसू......

आणि

जेंव्हा

गालात येते हसू

तेंव्हा ते

डोळ्यात आणतात आसू......!

नाते मैत्रीचे असेच असते

अतूट बंधन जपत असते

दूर असो की जवळ

ते सदैव अबाधितच राहते....!

जेंव्हा जेंव्हा गरज असते

तेंव्हा तेंव्हा ते जाणवते

दूर असले तरी ते अतूट असे

जवळचेच असते,जवळचेच असते....!


Rate this content
Log in