नाते लेखणीशी
नाते लेखणीशी
1 min
328
दि.सतरा सप्टेंबर दोन हजार सतरा
अचानक मला काय उपरती झाली
मी चक्क कवितेचा ध्यास घेतला
अन चक्क मला कविता करता आली...
प्रम जरा यमकाचा गोंधळच उडायचा
मग मी जरा इतर रचना न्याहळू लागले
चारोळीच्या प्रेमात मात्र आनंदाने पडले
कवितेच्या रचना करण्यातच रमले....
नाते लेखणीशी हळूहळू जमले
हल्ली जरा छान रचना होतात आता
मनाला माझ्याच खूप रचना भावतात
कवितेच्या नावाखाली मी नाही मारत बाता...
खरचच कविता करायला आल्यावर
हर्षाने मनातील मयूर नृत्य करू लागले
गगनी मन खगाप्रमाणे विहारू लागले
आता सर्वच समूहात वसुधा नाव बहरास आले.....
