नात मैत्रीचे
नात मैत्रीचे
1 min
255
कधी कुणी तरी येते
स्पंदने जुळूनी आपलं होतं
जन्मजात नाही लाभत
नात मैत्रीचे ते जुळतं..
नाही कुठे उरे भेद
नाही कसले रे नियम..
दुख सुख ओझं
आपल्या सोबत रे पेलतं..
कधी रुसण्याची
कधी हट्ट धरण्याची
तर कधी ती भांडणाची जागा..
आपल्यातलं काहीसं
जागवतं,काहीसं पेरतं..
अडचणीत विलंब न करता
धावून पहिले येत
कधी आपल्या प्रेमासाठी
खचते ते खातं..
कधी आपल्यासाठी
पोस्टमेन होऊन ते चालतं
पकडल्या वर ते मार ही खातं
नात मैत्रीचं असंच रुळतं
