STORYMIRROR

शशिकांत राऊत

Others

3  

शशिकांत राऊत

Others

नारीशक्ती

नारीशक्ती

1 min
320

नारीचे कर्तुत्व, पुराणात ग्वाही,

अशा माऊलीत, नारीशक्ती पाही।।


आनंदाचा क्षण, विवाह सोहळा,

लेवूनिया भाळी, कुंकवाचा टिळा,

शुभ समयी, पती देवाला पाही।।


नाचुनिया गाती, नाती गोतावळा,

सनई चौघडा, वाजंत्रींचा मेळा,

मंडपात ती, संसारसुख पाही।।


बहिण भावाच्या, मायेनं सकळां,

भेटे नंदा, दिर, सासरच्या कुळां,

सासू सासऱ्यात, आईबाबा पाही।।


सासरी सकळां, लावूनिया लळा,

मारुनिया मिठी, भेटूनिया गळा,

करुनी सारी कामं, देवाला पाही।।


रमुनी संसारी, सांभाळीते बाळा,

हसते गाली त्याचा, पाहूनी चाळा,

कडेवरी घेऊनी, मायेनं पाही।।


स्त्रीची ही कहाणी, भरुनिया डोळा,

मायेच्या कुशीत, भावनांचा मळा,

अशा नारीस, माऊलीसम पाही।।


Rate this content
Log in