नारीचे मन
नारीचे मन
नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असाव
गाणं गाता गाता प्रीतीत चिंब भिजाव....
नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असावं
माझ्या कविता ऐकताना त्यातच रंगून जावं.....
नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असावं
माझ्या डोक्यावरून हात फिरवत माझ्यात रमावं.....
नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असावं
तुझी अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यात मी रममाण व्हावं....
नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असावं
प्रेमानं हात हाती घेवून मनातल तुला सांगावं....
नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असावं
बरसणार्या पावसाच्या थेंबांशी हितगुज करावं....
नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असावं
गुलाबी थंडीत एकमेकांच्या बाहूत झोकून द्यावं...
नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असावं
सार्या दुनियेचं भान काही क्षण तरी विसरावं....
नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असावं
कुटुंबाचे सुखदुःखाचे क्षण वाटून घ्यावं....
