STORYMIRROR

Abhilasha Deshpande

Others

3  

Abhilasha Deshpande

Others

नारी

नारी

1 min
219

आकाशी धगधगती सौदामिनी तू

ओलावून बरसणारी श्रावणी तू

उन्हात गारव्याची सौमिनी तू

थंडीच्या शहा-यात उबेची दुलई तू!धृ!


जिवाश्मांची वसूंधरा

योवनाची कामिनी तू

हिमतीची वाघिण तू

कुळाची स्वामिनी तू!1!


पतीची अर्धांगिणी तू

लेकराची माऊली तू

मैत्री जपणारी सखीण तू

भावाची पाठराखीण बहिण तू!2!


ज्ञानाचा प्रसार करणारी विद्या तू

स्वरांची सुरेल सरस्वती तू

शब्दातून जीवंत अशी कविता तू

साहित्याचे जल वाहणारी सरिता तू!3!


आजच्या युगाची प्रगती तू

प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू

खरच सा-यांच्या यशाची किर्ती तू

कलेच्या क्षेत्रात नटराजाची मूर्ती तू!4!


ना संपणार तुझे अस्तित्व

ना तू विरळ होणार

तुझवाचून हे विश्व रिक्त

किती गावी तुझी महती

शब्द अपूरे पडे लेखणी!5!


Rate this content
Log in