नारी शक्ती
नारी शक्ती
मज नजरेतून दिसतं
समर्पण आहे तुझ्यात
आहेस तू शक्ती दुनियेची
अनुभवतो ती तुझ्यात।
मी तुझ्यात पहातो आहे
समर्पण प्रेमाचं
समर्पण मायेचं
समर्पण सेवेच
तु शीतल आहेस
तुझ्यात करुणा आहे
तुझ्यात दया आहे
तुझ्यात संरक्षण आहे
तुझ्यात पर्वा आहे
तुझ्या स्पर्शात जीवनाचा विश्वासआहे
तुझा स्पर्श मनाला चंदन बनवितो
तापलेल्या मनाला तुझ्या स्पर्शाने
थंड पाण्याचा शिडकावा होतो
कठीण रस्ता कापताना
थकलेल्या शरीरास उभारी येते
अंधारात असलेला आम्ही
तुझ्यामुळे शूर बनतो
तू नवी दिशा दाखविते
आम्ही तुझ्या प्रेमाचे आभारी आहोत
आम्ही तुझ्या मायेचे कर्जदार आहोत
आम्ही ऋणी आहोत तुझ्या
समर्पणाचे
धन्यवाद नारी तुला त्रिवार धन्यवाद।।
