नारी शक्ती
नारी शक्ती
1 min
270
काय वर्णावे स्त्री शक्तीला
पराक्रम असतात चमत्कारिक
जाण ठेवते परिस्थितीची
कुठून बळ आणते अचानक
जागरूक हर समयाला
भान बाळगते संकटात
लावून शक्ती प्राणपणाने
ममता भरलीय मनात
काळीज आहे जिजामातेचे
शौर्य राणी लक्ष्मीबाईचे
त्याग पहा पद्मावतीचे
कधी मृृदु तर कधी कठोर
भाव अनेक चेहरा एक
कधी सीता कधी द्रौपदी
नाते निभवते एकेक
