नारी गं नारी
नारी गं नारी
एकवेळ तू चुल मुल सांभाळलेस
चार भिंतींच्या आत तु अन्याय सहन
केलास मान्य आहे मला
नारी गं नारी
पण आता काळ बदललाय
तुझ्या पोटी जन्मलेला मानव
तुझा शत्रू बनू पाहतोय
तुझ्या अब्रुंची लक्तरं
वेशीवर टांगतोय
नारी गं नारी
तू कालिका, दुर्गा हो
मनातील भयाच्या शृृंखला तोड
तुझ्यातील आत्मविश्वास शक्ती
जागृत कर.....
नारी ग नारी
या शक्तीरुपी बळावर
मानवरूपी नराधमाला
पायाखाली चिरडून टाक
नारी ग नारी
शेवटी काय...?
हेच नराधम तुझ्या पायाशी
लोळण घेईल तुझा विजय होईल
नारी गं नारी
आपल्या आया बहिणींचा
जयजयकार करतील
नारी गं नारी
नारी गं नारी
नारी गं नारी.
