नार मी नव्या युगाची
नार मी नव्या युगाची
1 min
268
शाळा शिकुनी साक्षर
न राहिले निरक्षर
नका ठेवू मजला पडद्याआड बंदिस्त
मी पुढारलेली बाई आहेच बिनधास्त||धृ||
आधुनिक युगाची मी
मिळविते संधी नामी
कमवते रोजीरोटी
माझ्यात नाहीच कमी
खंबीर आहे मी तरुणी आजची निर्धास्त
मी पुढारलेली बाई आहेच बिनधास्त||१||
फॅशनेबल पोशाख
वस्त्रे माझी आधुनिक
शिकले ज्युदो कराटे
ठेवा इरादे हो नेक
ठाम माझे अस्तित्व जरी असे मी उद्ध्वस्त
मी पुढारलेली बाई आहेच बिनधास्त||२||
