नाळ...
नाळ...
पोटाशी तिच्या नाळ माझी जोडली ....
नातं आमचं जन्मोजन्मी...
गर्भातुन तिच्या पाहिली दुनिया सारी...
पाहिले मी पहिल्यांदा तिला माझ्या पिटुकल्या डोळ्यांनी ...
मायेच्या स्पर्शाने जाणवलं की ही च माझी आई ....
धबधबब्या सारखं ओसंडून वाहत तिचं प्रेम ...
आकाशा सारखं उंच तिच मायेच घर ...
वाऱ्या सारखा तिचा तो राग ...
सावली सारखी तिची ती काळजी .....
माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी डोळे उघडले आणी मी माझ्या आईच्या प्रेमात पडले ....
कारण प्रेम खुप नात्यात असतं पण आईच प्रेम स्वार्थी नसत....
