नाही इथे कोणी कोणाचा
नाही इथे कोणी कोणाचा
माणुसकीचा वाजतो बाजा
हरेक जण मोठ्या बापाचा
हवाय सर्वांना मान तुऱ्याचा
नाही इथे कोणीच कोणाचा
छाती काढून पुढे चालतो
दुजापुढे कधी ना झूकतो
गर्व अभिमान सदा दिसतो
ना कुणापुढे मान तूकवितो
कसा रे माणसा तू बदलला
रक्ताच्या नात्याला विसरला
पैशाला मान देऊन राहिला
स्वार्थासाठी पदर पसरला
जीवन आहे अनमोल वेड्या
नको पैशात कधी तोलूमोलू
शंभर नंबरी सोन्याची नाती
नको अपमान अपशब्द बोलू
कर पूर्वीसारखे निर्व्याज प्रेम
जपूनि नाती सारी जीवापाड
विसरून जा मानसन्मानही
अहंभाव नको आणूच आड
चार दिवसांची जिंदगी आज
झालीय ईश्वर कृपेने बहाल
जग सुखासमाधानानेच इथे
नको वागूस मानवा बेताल
सारेच आपण देवाची लेकरे
मिळूनमिसळूनी राहूया सारे
बंधुभाव न् समतेनेच वागू या
एकजुटीचे वाहू दे इथे वारे
