STORYMIRROR

Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

नाही इथे कोणी कोणाचा

नाही इथे कोणी कोणाचा

1 min
503

माणुसकीचा वाजतो बाजा

हरेक जण मोठ्या बापाचा

हवाय सर्वांना मान तुऱ्याचा

नाही इथे कोणीच कोणाचा


छाती काढून पुढे चालतो

दुजापुढे कधी ना झूकतो

गर्व अभिमान सदा दिसतो

ना कुणापुढे मान तुकवितो 

 

कसा रे माणसा तू बदलला

रक्ताच्या नात्याला विसरला

पैशाला मान देऊन राहिला

स्वार्थासाठी पदर पसरला


जीवन आहे अनमोल वेड्या

नको पैशात कधी तोलूमोलू

शंभर नंबरी सोन्याची नाती

नको अपमान अपशब्द बोलू

 

कर पूर्वीसारखे निर्व्याज प्रेम

जपूनी नाती सारी जिवापाड

विसरून जा मानसन्मानही

अहंभाव नको आणूच आड


चार दिवसांची जिंदगी आज

झालीय ईश्वर कृपेने बहाल

जग सुखासमाधानानेच इथे

नकोच वागूस तू मस्तवाल


सारेच आपण देवाची लेकरे

मिळूनमिसळूनी राहूया सारे

बंधूभाव न् समतेनेच वागूया

एकजूटीचे वाहू दे इथे वारे


Rate this content
Log in