नागपूजा
नागपूजा
1 min
279
सण आला ग पंचमीचा
झिम्मा, फुगडी चला घालू या
झोक्यावरही मस्त झुलू या
आनंद सणाचा हो घेवू या....
श्रावण मासातील सण बाई
नागपंचमीचा हा मुली बायांचा
काकणं भरू रंगीबेरंगी हाती
नाद करू बाई मंजूळ पैंजणाचा....
घरात देवापुढे नागोबा पुजू या
लाह्या दुधाचा नैवैद्य दाखवू या
उपवासही भावासाठी धरु या
नागदेवतेची पूजा मनोभावे करू या...
शेतकर्याचा मित्र हा नागोबा
नागपूजा कराया वारूळाला जावू या
नागपंचमीचा सण या नागदेवतेचा
वारूळाभोवती नागपूजन करू या....
