नागपंचमी
नागपंचमी
श्रावण आला हिरवा शृंगार नेसून
नागपंचमीचा सण साजरा करतात
स्त्रिया नवीन अलंकार नवीन वस्त्र नेसून
प्रत्येक नववधू माहेरी येते
सासरला क्षणिक विसरून
भावाने झाडाला बांधून दिलेले
उंच उंच झोके घेते
सोबतीच्या मैत्रिणीबरोबर
झिम्मा-फुगडी खेळतात
हर्ष उल्हास आणि आनंदातले
सुंदर क्षण टिपतात
नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया उपवास करतात
भावाला चिरंतन आयुष्य़ लाभो
प्रत्येक संकटातून तो तारला जावो
म्हणून नागराजाकडे प्रार्थना करतात
हळद-चंदनाचे ताट घेऊन
नागोबाला पूजायला जातात
दूध-लाह्याचा नैवेद्य दाखवून
बहीणीचा रक्षणकर्ता भाऊ माझा पाठीराखा म्हणून नागदेवतेची पूजा करतात
नागपंचमीच्या दिवशी चिरणे, कापणे, तळणे, तवा चुलीवर ठेवणे टाळतात
आजही कित्येक ठिकाणी हे पारंपरिक संकेत पाळतात
सुंदर असा नागपंचमीचा सण साजरा करतात
गव्हाची खीर किंवा पुरणाची दिंड करून उपवास सोडतात
