नादान होते रे मी
नादान होते रे मी
1 min
312
नादान होते रे मी
सोडून गेले तुला
येशील परत घेण्यास तू
खात्री होती रे मला....
दोष होते तुझे का ?
होते रे माझे गुन्हा
प्रयत्न केले नाही
भेटण्याचे दोघेही पुन्हा.......
परतीच्या वाटेवरती
मी टाकले नाही पाऊल
का विसरलो नाही ?
मिळून आपण चुकभूल....
शोधला असता मार्ग तर
सुटला नसता का रे गुंता
मी पणाच्या गर्वामध्ये
उगाच वाढवत गेलो तंटा.....
तुझ्या माझ्या नात्यात
होते रे जन्मानंतरीचे गाठ
रागाच्या भरात तू ही
फिरवला माझ्याकडे पाठ.....
क्षणभराच्या गैरसमजाने
तुटले रेशमाचे बंध
प्रेमाचा ही प्रकाश झाला
आपल्या दुराव्याने मंद......
