नाच रे!
नाच रे!
1 min
496
कारे नाचतोस डोईवरी
गप गुमान ये भुईवरी
सफेद रंगाची नको फुशारकी
रंगपंचमीत घेतील गिरकी
सर्व रंगांची शाल बघ मी पांघरली
नाही भीती रंगपंचमी जरी अवतरली
रंगपंचमीचा नियमच न्यारा
सर्वांना तो आहे प्यारा
बघताय काय सामील व्हा
नाहीतर फुकाचे रंगून जा
म्हणून म्हणतो जमिनीवर ये
रंगात आज जरा रंगून घे
राग रुसवे फुगवे सोडून दे
आनंदात एकदा नाचून घे
जीवनाचे रंग उरात भरून घे
उर भरून एकदातरी जगून घे
रंगपंचमीची मजा लुटून घे
सर्वांनाच आता समजून घे....!!!
