STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

नाच रे पोरा ( विडंबन काव्य )

नाच रे पोरा ( विडंबन काव्य )

1 min
145

नाच रे पोरा रोपोसो अॅप वर 

नाच रे पोरा नाच..


चिन ने पंगा केला रे

युद्धाचे ढग जमले रे 

ॲप डिलीट चिनी केलेत सर्वांनी 

टिकटॉक सोडून नाच, नाच रे पोरा...


एकोणसाठ अॅप हेरली रे

प्ले स्टोअर वरून झडली रे

आनंदाने गाऊ चिनी नाही भाऊ

वाजवून नगारा नाच, नाच रे पोरा...


व्हाट्सअप वर मेसेज फिरती रे

पर्यायी अॅप सांगती रे

डाऊनलोड जोरात आत्मनिर्भरात

निळ्या आकाशी नाच, नाच रे पोरा....


चिन ची गुर्मी थांबेल रे

सोशल वार युद्ध छेडले रे

ध्वज भारतीय नभी तो फडकत

स्वाभीमानाने नाच, नाच रे पोरा...



साहित्याला गुण द्या
लॉग इन