STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Others

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Others

|| न परतणारी पाखरें ||

|| न परतणारी पाखरें ||

1 min
322

लग्न झाले, पाळणा हलला वर्षाने

आनंदाने गिरकी घेतली हर्षाने

 

मुलगा झाला, वाटले पेढे 

आनंदाने मन झाले वेडे  

 

संस्काराने केले मोठे  

चाळीत घर रहायला छोटे  

 

पै पै जमवुन डॉक्टर केले तुला  

आई बाबांना न विचारता, परदेशी गेला मुला  

 

संसार तुझा तु तिथेच थाटशील हि कल्पना नाही शिवली मनात  

आमचा तुला भार, दाखऊन दिले जनात  

 

वाट बघुन शिणले शरीर, झाले कोरडे डोळें 

तु येण्याची तरीही वाट बघते, हे मन भोळे 

 

तुझ्याकडे आहे गाडी, बंगला 

तु दुर देशी रहाणार, आमचा जीव खंगला

 

जाता जाता थोडी पुंजी राखुन ठेवली तुझ्यासाठी  

तु मेसेज देतो नको मला काही, वापरा तुमच्या औषधासाठी  

 

नको करु आमची देखभाल, गरीबांना दे उपचार 

लाखमोलाच्या आशिर्वादाने तु होशील मालामाल 

 

जिवंत रहातील लाखो कुटुंब, नाती

हिच खरी संपत्ति

तुझ्या मोलाच्या उपचाराने, नाही येणार कुटुंबावर आपत्ति

 

आर्त हाक एका आईची, सलाम करते जग सारे डॉक्टरी पेशाला 

स्वस्त मोफत उपचारांची खरी गरज, आहे लेकरा आपल्या देशाला ||

 



Rate this content
Log in