STORYMIRROR

Anup Salgaonkar

Others

3  

Anup Salgaonkar

Others

मूठभर आभाळ

मूठभर आभाळ

1 min
272

मूठभर आभाळ हवंय

निरव, निर्भय, निर्भिड

स्वतःचं स्वतःसाठी


मनाच्या फिरकीला

भावनांचे दोर बांधून

आठवांचे पतंग उडवायला....


अंधाऱ्या रात्री

चंद्राच्या साक्षीने

चांदणं पायदळी तुडवायला....


कष्टाचं बाष्प

ढगांत भरून

यशाचा पाऊस झेलायला ......


आनंदघन

वाऱ्यावर विरून

अंतरंगी दरवळायला.....


संपता संपता

नव्या उमेदीनं

सूर्यासारखं उगवायला....


मूठभर आभाळ हवंय

स्वतःचं स्वतःसाठी.....


Rate this content
Log in