मूल्य मराठीचे
मूल्य मराठीचे
1 min
134
मनामनात मूल्य मैत्रीचे मौल्यवान मानिती.
मानिनी मनस्वीनी मितभाषी मृदुवाणी माय मराठी.
मृदुगंध, ममतेचा मृदुंग मांगलयाचा.
मृद्स्वर जणू मीरेच्या मोहनाचा
माय मराठी माझ्या मनपटलाचा मुग्ध मुक्त मल्हार.
मुरलीच्या मधूरसुरावर मोहून मोहरला मोरपिसारा
मायमराठी मुलख मराठयांचा मुरलया मिश्रीत
मुरंब्यासम मायाळू मिलनाचा.
माय मराठी मशहुुुर मर्दानी मुखीया मुुुुलुखाची
माय मराठी मैलोनमैल मृृगया महापराक्रमाची
मातृभूमीच्या मानापायी मागतो मंझिल मरणाची.
