STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Children Stories Fantasy Children

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Children Stories Fantasy Children

मुंगी

मुंगी

1 min
190

एक होती काळी मुंगी

आणि एक होती लाल मुंगी

भेटल्या वाटेत दोघी एकदा

मारू लागल्या तिथेच गप्पा


सरसर चढली झाडावर

ताव मारला आंब्यावर

पोटभर रस प्यायली मुंगी

टम्म झाले पोट आली गुंगी


आंब्यावरच मुंगी लवंडली

गाढ झोप तिला लागली

आंबे झाडावरून उतरवले

मालकाने पेटीतून पाठवले


झोपेतून जेव्हा उठली मुंगी

डोकावून पाही आलं फुरसुंगी

पाहिले तिने आजूबाजूला

प्रवास गाडीतून तिचा चालला


काळ्या मुंगीचा असा प्रवास

ऐकून लाल मुंगीला झाला त्रास

घेऊन गेली आपल्या वारुळात

केला पाहुणचार ठेवले आनंदात


Rate this content
Log in