मुंबईचं घर
मुंबईचं घर
1 min
515
गावाकडची घरं, टुमदार छान
मुंबईचं घर आकाराने लहान
घराच्या भव्यतेशी, देणं घेणं नाही
स्टेशन जवळ घर, यासारखं दुसरं सुख नाही
रोजच खडतर लोकलचा प्रवास
प्रवासात जातात दिवसाचे दोन तास
घरच्या सुख सोयीच्या
नाहीत मोठ्या अपेक्षा
परतल्यावर एकत्र जेवण गप्पा
इतकी साधी सोपी इच्छा
