STORYMIRROR

Gangadhar joshi

Others

3  

Gangadhar joshi

Others

मुंबई

मुंबई

1 min
360

जो तो पक्ष्यांचा वाजवतो सम्बळ

मुंबई नगरीत घातलाय गोंधळ


शेतकऱ्यां च्या नावानं उदो उदो करती

उसनं अवसान नरड साफ करती

आत्महत्या झाली की माजते खळबळ


सेव्हन स्टार हॉटेल वर गाड्यांची रांग

पत्रकार परिषदेत देतोय बांग

मध्येच कोणी करतो चुळबूळ


फोडा फोडीचे निस्त राजकारण

अभद्र युतीचे मांडता गाऱ्हाणं

चर्चा वर चर्चा नुसती वळवळ


लोकशाही च्या नावाचा नंगा नाच

संविधाना चे पाडता मेख आच पेच

प्रत्येकाला च आहे योग्य संख्या बळ


घोड्याना ठेवतील कोंडून तबेल्यात

चुकून फसला तर जाईल बाजारात

सामान्य जनतेच्या तोंडाला पुसलं काळ

मुंबईच्या नगरीत चालु हाय गोंधळ


Rate this content
Log in