STORYMIRROR

Raakesh More

Others

4  

Raakesh More

Others

मुंबई लोकलचा पॅसेंजर

मुंबई लोकलचा पॅसेंजर

1 min
461

जीवन पैजेवर लावून जगतो मुंबईकर 

जरा लोकलला लटकणारा पॅसेंजर बघ 

कितीही गर्दी वाढली तरीही 

तिच्यातून सटकणारा पॅसेंजर बघ||0||


ट्रेन किती लेट आहे हे कळावं 

म्हणूनच तर इंडिकेटर असतं 

त्याचं गाडीच्या वेळेवर येण्याशी 

काहीही देणंघेणं नसतं

गर्दीतून उतरता आलं नाही म्हणून 

पुढच्या स्टेशनवर भटकणारा पॅसेंजर बघ 

कितीही गर्दी वाढली तरीही 

तिच्यातून सटकणारा पॅसेंजर बघ||1||


चालत्या ट्रेनवर माकडउडी मारणारे 

आदिमानव दिसतात इथे 

मरणाशी खेळ खेळणारे 

धाडसी दानव दिसतात इथे 

मरणाच्या नजरेत नजर मिळवून 

त्याला झटकणारा पॅसेंजर बघ 

कितीही गर्दी वाढली तरीही 

तिच्यातून सटकणारा पॅसेंजर बघ||2||


गर्दीत चिरडून अगदी विनामूल्य 

मालिश होत असतं इथे 

जॉगिंगची गरजच पडत नाही 

जेवण लगेच पचतं इथे 

आयुष्य बदलत नाही ही गोष्ट 

मनाला खटकणारा पॅसेंजर बघ

कितीही गर्दी वाढली तरीही 

तिच्यातून सटकणारा पॅसेंजर बघ||3||


पिक्चरचे स्टंटमन नाव कमावतात 

इथे मात्र विनामूल्य सर्व

फुकट करमणूक करतात साऱ्यांची

जराही नाही त्यांना गर्व 

मृत्यूशी खेळ खेळता खेळता 

मृत्यूला हटकणारा पॅसेंजर बघ 

कितीही गर्दी वाढली तरीही 

तिच्यातून सटकणारा पॅसेंजर बघ||4||


मुलाबाळांच्या पोटासाठी 

धावत पळत गाडी पकडणं 

चेंगरा चेंगरीत तोल जाणं 

तोल जाऊन मग धडपडणं 

हात सुटून दारावरचा 

अपघाताने गटकणारा पॅसेंजर बघ 

कितीही गर्दी वाढली तरीही 

तिच्यातून सटकणारा पॅसेंजर बघ||5||


Rate this content
Log in