मुलीचा मामा
मुलीचा मामा
बहिणीच्या मुलीचे लग्न जमले की
मामा हे दोन शब्द असतात
प्रेमळ हक्काने रागावून कधी मानाने
मांडव टाकण्यापासूनच धावपळ।
मामा, मामा नाव असते तोंडात
पहिली मूळचीठी मुलीच्या मामाना
पाठीशी नवरीच्या उभा
याची अगत्य आम्हा सर्वांना।
एकीकडे तो ताईला आपल्या
सावरत तो प्रेमाने असतो
आसवे तिचे पाहून त्याचाही
जीव थोडा थोडा होत असतो।
भाची देखील पहिला शब्द
ऊच्यारत असते बोबड्याने मामा
बालपणी मामाच घर म्हंटल की
रहायला जाण्यासाठी धिंगाणा।
लग्नात मामाला आवाज देऊन
सगळे करत असतात परेशान
प्रेमळ भाऊ बहिणीच्या नात्याला
खरच कीती आपुलकीचा मान।
किती आपुलकीचा मान।
