मुलीचा बाप
मुलीचा बाप
1 min
100
नका मागू तो हुंडा माझ्या बापाला,
बाप माझा अडाणी आहे,
पै पै पैशासाठी,
रात्रंदिवस काम करतो.....
पोटात गोळा त्याने,
एका शब्दावर देऊन टाकला,
गिळून हुंदका रडण्याचा,
कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडला,
थोडंफार शेत कोरडवाहू,
माझा बाप रोज हाकतो,
डोक्यावर ओझं सावकाराचं,
ते होईल तसेच फेडतो. ....
काही नाही घरी आहोत,
संसार झोपडीत चालतो,
तरी करुन उंच बाप,
सर्व खर्च शिक्षणात भरतो. ....
स्वत:साठी काही नाही केलं फक्त माझ्यासाठीच करतोय,
कसं होईल माझ्या पोरिचं,
असा विचार करत बसतोय.....
