STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

"मुलगी झाली हो"

"मुलगी झाली हो"

1 min
365

बदलतात रंग क्षितिजाचे

 होते खरे जग सुरू

 बदलते विश्व घरातील सार्‍यांचे  


इवलेसे पाऊल पडता अंगणी  

घरात सर्वत्र होते रोशनाई

बाग फुलांनी बहरते, दारी सजते नवलाई 


गोंडस, गोजिरी चिमुकली रूप तिचे दिसे साजरे  

नाजूक तिचा स्पर्श मन हे गहिवरे


 नटली धरणी जणू स्वागता 

तिचा येण्याचा आनंद ओसंडतो न सांगता


आईला थकवणारी बाबाला हसवणारी

 घरात आल्या, आल्या सर्वांच्या कुशीत शिरणारी

 आजी-आजोबांचा विरंगुळा 

 बोबडे बोल तिचे ऐकुनी होई हर्ष सर्वांना वेगळा  


परीचा फ्रॉक घालून तुरुतुरू धावतांना 

 रुणझुण वाजते जेव्हा तिचे पैजण  

खळखळून हसल्यावर घरात शोभते

 जैसे तुळशीवृंदावन 

सोनेरी ते दिवस क्षणिक भासते


चंद्र कलेप्रमाणे ती मोठी होते

 अनेक सुख-दुःखाचे क्षण देऊन जाते 


 लटकेच रूसणे आणि लगेच हसणे 

निर्भेळ सुख आनंद देऊन जाते 


हट्ट करणारी पण कशाचा हट्ट करावा

 हे ठाऊक असणारी 

कधी एखाद्याला प्रेमाने समजणारी 

तर कधी योग्य रीतीने समाचार घेणारी 

 प्रेम, माया अन् काळजी चे शब्द सदैव ओठी

 असणारी 


 मनात असतात तिच्या असंख्य आशा

 आई-वडिलांच्या मनाची तिला कळते भाषा  


 लग्न होईपर्यंत काळजाचा तुकडा ही बनून राहते  

आपल्या काळजाच्या तुकड्याला 

स्वाधीन करण्याची लगेच वेळ ही येते 


 तिच्या विवाह संस्काराचा घातला जातो मग मेळ  

हृदय गहिवरून येते डोळे पाणावतात

 मन भरून बघितले जाते तिच्याकडे 


ह्रदयावर जणू दगड ठेवून केले जाते कन्यादान 

शुभ आशीर्वाद देतात घरचे सगळे 

"सुखी राहा पोरी सासरी सौख्यात नांद"


 कर्तव्यपूर्ती करत केले जाते जीवाच्या तुकड्याचे दान 

सासरी गेल्या मुली तरी असतात 

आई-वडिलांचा जीव की प्राण....


Rate this content
Log in