मुलगी झाली हो
मुलगी झाली हो
1 min
424
मुलगी झाली मुलगी झाली
घरात लक्ष्मी आली।
कोणी म्हणे पहिली बेटी धनाची पेटी।
आईचे होतसे स्मित हास्य ओठी।
बाबा म्हणे इवलीशी परी आली माझ्या घरी।
करील माया आता माझ्यावरी।
आजोबा आजी म्हणे आमची दुधावरची साय।
काठीला आधार आमच्या देईल
सावरील आमचे आडखळणारे पाय।
अश्याच घरी जन्म मुलीचा होवो।
ना वाईट बोलणे, ना नाक मुरडणे,
मुलगी झाली हो ,मुलगी झाली हो सगळे सांगे आनंदाने।
