मुलगी असता घरी
मुलगी असता घरी
1 min
191
मुलगी असता घरी
होई लक्ष्मीचे आगमन,
मिळे सर्वांना अलगद
प्रेम , वात्सल्याची शिकवण !१!
आई वडिलांची ती परी
करे त्यांचे नाव रोशन ,
दोन दोन घरे संभाळून
परतवते देशाचे संकट भीषण !२!
भावाची ती लाडकी
त्यांच्यासारखं नाही नात,
रात्रं दिवस लढाई तरी
एकमेका निःस्वार्थ प्रेम देत !३!
बहिणीची तर ती असे
सर्वाहून लाडकी सखी,
तीच जाणून घेई प्रत्येकाला
असता घरात कुणीही दुःखी !४!
आजी बाबांची ती काठी
दाखवे उतरवायत मार्ग,
मुलगी असता घरी
होई सारे घरच स्वर्ग !५!
मुलगी असता घरी
घर वाटे सुंदर स्वर्गावून
तरी का तिच्या अस्तित्वावर
प्रश्नचिन्ह तिचे कर्तृत्व पाहून !६!
