मुक्त
मुक्त

1 min

64
मी तर माझ्याशीच झुंजतो,
उगा वाटे जगी भांडतो.
माझे अंतर द्वंव सारखेच चाले.
नकळत माझ्या, ते अविरत बोले.
उणे काहीतरी ते सततची शोधे,
जे त्याला नचि शोभे.
मी बंधन मुक्त त्याच्या, भीड म्हटले कल्पनांशीच स्वतःच्या
हा खेळ सर्व मी शांत पाहतो,
धांदल थांबली की मी त्यावर काव्य लिहितो.