मुक्त मी!
मुक्त मी!
1 min
681
उघडली दारे ज्ञानाची
घेते आज मोकळा श्वास
ज्योती-सावित्रीच्या कष्टाने
आले आज कवेत आकाश
होती कधीचे बंधन सारे
बंदिस्त पिंजर्यात पाखरे
वाटा प्रगतीच्या चालतांना
सभोवती निरक्षरता फास
ज्योती-सावित्रीच्या........
बेड्या तोडुन परंपरेच्या
गुलामीच्या, विषमतेच्या
मुक्त मी जगते आहे
घेऊन एक मनात ध्यास
ज्योती-सावित्रीच्या.......
ज्ञान-विज्ञान, समाजसेवा
वाटे आज सार्यास हेवा
देशासाठी गाळत घाम
सार्थकी ठरवत त्यांचा विश्वास.
ज्योती-सावित्रीच्या कष्टाने
आले आज कवेत आकाश
