STORYMIRROR

Sonam Thakur

Others

3  

Sonam Thakur

Others

मुक्त जगणं

मुक्त जगणं

1 min
11.7K


उपक्रमाचा विषय वाचून 

माझी मन कळी खुलली

या विषयाशीचं तर आहे 

माझी नाळ जुळली

लिहिण्याची आहे मला प्रचंड आवड

त्यासाठी नेहमीच काढते मी सवड


लिहिण्यामध्ये मी छान रमते 

शब्दांच्या दुनियेत स्वतःला हरवते

कवितेचं जग किती सुंदर

भाव भावनांचं विश्व मनोहर

लिहिते मी कधी कधी लेख

असतो त्यात विचारांचा उल्लेख


फुलपाखरासम बागडणं

मला नेहमीच आवडतं

पक्ष्यासारखी भरारी घ्यायला 

मन नेहमीच आतुर असतं

नवनवीन ठिकाणं फिरण्याचा मला छंद

तिथले उत्तम प्रकारचे पदार्थ खाण्यातं मिळतो मला आनंद


निसर्गाचे सुंदर रूप पाहणे हा माझा ध्यास

तिथल्या हवेत घेते मी मोकळा श्वास

हायकिंग, ट्रेकिंग,राफ्टिंग मला खूप आवडते

त्यात मी स्वतःला पूर्णपणे विसरते 

माणसाने एकदा तरी मोकळं जगावं

निसर्गाच्या सानिध्यात जाऊन एकरूप व्हावं


आपल्या माणसांना जेवू घालण्याचा

आहे मला नाद

मी केलेल्या पदार्थांचा 

घेतात ते छान आस्वाद

मी जाते ज्या ठिकाणी तेथील पदार्थ घेते मी शिकून

घरी आल्यावर ते पदार्थ नक्कीच पहाते करून


माझ्या आवडी मी अश्याच कायम जपणार

चांगली व्यक्ती म्हणून नेहमीच उत्तम आयुष्य जगणार


Rate this content
Log in