STORYMIRROR

pranav kode

Others

3  

pranav kode

Others

मुखवटा

मुखवटा

1 min
323

आठवतोय तो अजूनही,

कित्येक जण अजूनही येतात

माझ्या दाराबाहेर

तेच मुखवटे लाऊन

दुःखाचे अभिनय करत

सुखाच्या अपेक्षेने

कोण, कशी आणि का पसरवतं

अशी खोटी अफवा कुणास ठाऊक

की मी खूप सुखी आहे.

मग मलाही करावाच लागतो अभिनय

आणावा लागतो आव मी सुखी असल्याचा.

येतं रडू बर्‍याचदा

रडतोही मी

पण अलगद

डोळ्यांच्या पापण्या न भिजवताच.

करावाच लागतो अभिनय

तिसर्‍या घंटेनंतर

बालवयातील पहिली घंटा जाते निघून

खेळता खेळताच

दुसरी घंटा पण निघून जाते

संसार मांडेपर्यंत

पण तिसर्‍या घंटेनंतर सुरू करावाच लागतो

अभिनय

कधी मनापासून तर कधी मनाविरुद्ध

कधी आपल्यांसाठी तर कधी

आपल्या भासणाऱ्यांसाठी

पण अभिनय करावाच लागतो...


Rate this content
Log in