मुके शब्द
मुके शब्द
1 min
252
शब्दही मुके
आज झाले
स्वप्नात रंग
भरुन आले...
विरह धुके
दाटून आले
पान सुके
उडून गेले...
वास्तव सारे
मिटून गेले
स्वप्न माझे
भंगून गेले...
रचत होते
दु:ख माझे
वाढत गेले
अंतर तुझे...
अंतिम क्षणी
साथ नव्हती
वाट तुझीच
पाहत होती...
प्रत्येक क्षण
पदरी आला
प्रेमात असा
घात झाला...
