मतदार राजा...
मतदार राजा...
1 min
302
जाग मतदार राजा जाग,
कर आता तरी तुझ्या एका मताचे साग।
समजू नको असे काय होईल माझ्या एका मताने
तुच नाही तर बाकी जगतील तरी सन्मानाने।
21 व्या शतकातील पिढी हो जागी,
तुच हो मतदान प्रबोधनकार जागोजागी।
संपू दे ही राजेशाही मतदारांची,
तुझ्या एका मताची किंमत तर कळू दे आता हवा उतरवू त्यांची।
जागा हो मतदार राजा जागा हो,
तुझ्या मताने समाज बदलायला सहभागी हो।
