STORYMIRROR

Sunita Ghule

Others

4  

Sunita Ghule

Others

मतदान-एक राष्ट्रीय कर्तव्य

मतदान-एक राष्ट्रीय कर्तव्य

1 min
558



सुजाण नागरीक तू देशाचा कर रे मतदान

राष्ट्रीय कर्तव्य बजावूनी राख मातीशी इमान ।।धृ।।


संविधानाच्या कलमांनी गुलामीतुनी मुक्त झाला।

किती वीरांच्या रक्ताने गगनी तिरंगा रे सजला।

लोकशाही गणतंत्राने दिले नागरीकाला दान।।१।।


राष्ट्रीय कर्तव्य बजावूनी....


योग्य नितीमत्ता असे ऐसा चारित्र्यसंपन्न नेता

करील विकास तव देशाचा निवडून दे आता

शाईचे निशाण बोटावरती राख मताचा मान।।२।।


राष्ट्रीय कर्तव्य बजावूनी.....


शेतकरी ,कामगारांचे हितासाठी जो झगडतो

मत त्याला देऊनी ध्येयवादाला निवडून देतो।

झुंडशाहीच्या विरोधात ठाकूया बंडाचे निशाण।।३।।


राष्ट्रीय कर्तव्य बजावूनी....


वचनांना,आश्वासनांना पूर्ण करील तोच सच्चा

सुरक्षा जनतेची, रक्षक मानी, जिंदादील अच्छा

अज्ञानी,गरीब जनतेच्या हिताचे नेत्याला भान।।४।।


राष्ट्रीय कर्तव्य बजावूनी...


नको परराष्ट्रधार्जिणा, भ्रष्टाचाराने खिसेभरू

सत्य, न्यायवादी लोकनेत्याची चल निवड करू

कर्तव्याप्रती जागृत असाच नेता भला महान।।५।।


राष्ट्रीय कर्तव्य बजावूनी...


Rate this content
Log in