मसाला
मसाला
1 min
24.3K
फिक जेवण बनवते
तरतरीत नि झणझणीत
नाही घातले खाण्यात
राहते ते मिळमिळीत
स्वाद आणते एकदम
झक्कास दमदार
खाऊन जीभ त्याने
चमकदार चटकदार
त्यांच्याविना ना
भावते भोजन
उणीव त्यांची
जाणवते मनोमन
मिरची, मिरी हे
तिखट जायकेदार
तेजपान, लौंग
चटकेदार तजेलदार
दालचिनी गुळचट
इलायची सदाबहार
चविष्ट होतो पदार्थ
हेच खरं, हेच खरं
शिल्लक राहते मीठ
पूर्णत्व येते त्याने
भोजन होते स्वादिष्ट
मान त्याचाच सर्वार्थाने......
