मसाला
मसाला
1 min
11.9K
मसाल्यावाचून जेवणात आणि
सोसल्यावाचून जीवनात चव येत नाही
थोडं गोड तर थोडं तिखटही असावे
वाढलेले जीवन सदा निगुतीनं चाखावे.
कमी अधिक पाहून करावी जोडणी
अंदाज घेऊन चवीची द्यावी बरं फोडणी.
पोटापुरते खावे आणि पोटापुरते प्यावे
भुकेल्या घास भरवून तृप्तीचे ढेकर द्यावे.
अन्न हेच पूर्णब्रह्म, अन्नदान जाणा श्रेष्ठ कर्म
जीवनाचे सजवावे पक्वान्न जानून खरे वर्म.