मृगजळ
मृगजळ
1 min
212
तारुण्याच्या उंबरठ्यावर
येता प्रत्येक क्षणी!!
मृगजळ भासतो क्षण
हर एक मनी!!
स्वप्न वाटते सर्व
निरागस असते जीवन!!
भास वाटतात सर्व हे
मृगजळ आजीवन!!
मन ही मन प्रेमवेडे
होते जीवन प्रेममय!!
क्षण तो निघून जातो
मृगजळ हे अक्षय!!
आभास होतो सौंदर्याचा
जीवन वाटे अतिसुंदर!!
मृगजळ हा असे मनाचा
कोमल जीवन अतिमधुर!!
मोह आवरून सर्व
वाट बघेल जरी!!
मृगजळ हे जीवन
दिशा सापडेल खरी!!
