STORYMIRROR

Anita Bendale

Others

3  

Anita Bendale

Others

मृदंगन्ध पावसाचा

मृदंगन्ध पावसाचा

1 min
183

पहिल्या वहिल्या अंघोळीने

भिजून लाजली ही धरती

बेधुंद होऊन सखा बिलगला 

थेंब ओघळती अधरावर्ती

गुल मोहरचा सडा पांगला


तप्त उन्ह तापती वरती

एक सर तो घेऊन आला

मृद गंधाचे अत्तर धारेवरती

हळुवार वारा चिंब धारा

धुक्या मधुनी पडती तुसे


मधेच सरीवर एक झरोका

पानातून येत असे

दवबिंदूची पहाट सजली हिरे

मणिके उधळीत

हिरवा शालू लेऊनी लतिका

शिशिर राजास लपुनी पाहत असे


उंच झुल्यावर वृक्ष लता

हिरव्या कपड्यात नटलेली धरती

तेज फुलांचे फुललेली मुखी

बहरली सृष्टी सारी फळा फुलांचा

वेल बुट्टीचा नेसते शालू भारी

कोकिळा गाते कुहुकुहू

नी मोर डोलूनी नाचे

फुला भोवती आनंदाने फिरती

भुंगे चाचे


निरझरत झरणा स्वर सुरात

नदीतलं धवधव नारे निर्मल जल

निरंतर कोमल ते डोहात

उंचावरून कोसळती धबधबे

पाखरांची शील गुंज संगती

कानात,विसवती घरट्यात

आनंदाने



Rate this content
Log in