STORYMIRROR

Sonali Kose

Others

3  

Sonali Kose

Others

मृदगंध पावसाचा

मृदगंध पावसाचा

1 min
225

गडगड नभात करतंय

मेघ लागले हो बरसु

चिंब चिंब सरिंत मी

भिजायला किती तरसू


वर्षा सरासर आली धावून

बळीराजा सुखावला बघुनी

बैल जोडी आपुली 

शेत शिवारी जाई घेऊनी


सप्तरंगी इंद्रधनु ची कमान

शुभ्र दुधाळ आकाशी शोभे

मन जाई बघताच हर्षूनी

चिंब सरिंत कल्पतरू उभे


येई श्रावण , श्रावण

घेऊनी चिंब चिंब ओलावा

पडे थेंब थेंब अंगी माझिया

शहारे येऊनी झोंबे गार गारवा


टपटप बरसती कश्या

ह्या रेशीम जलधारा

थंडगार अंगाला

येऊनी भिडे वारा


पडती कसे टपोरे थेंब

दरवळे सुगंध मातीचा

थंडगार वारा सुटला

किलबिलाट पक्ष्यांचा


हिरवा शालू नी हिरवा चुडा

परीधान करी वसुंधरा

धो धो बरसती अश्या ह्या

बेधुंद होऊनी जलधारा


चिंब सरींनी येई बहर

सुखावलेल्या कल्पतरुंना

सुगंध दरवळे ह्या जीवनी

नाच नर्तकी मोरांना


जलमय होई सारी ज्वाला

डोंगर कपारीतून वाहे झरा

तृष्णा भागली आसमंताची

येऊनी भिडे वारा


श्वासा श्वासात दरवळते

मनी मृदगंध पावसाचा

थंडी भिनते अंगात पुनः

घ्यावा आनंद चिंब सरींचा


Rate this content
Log in