मृदगंध पावसाचा
मृदगंध पावसाचा
सृष्टी जितकी रम्य सुंदर आणि मोहक आहे
तितकीच तिची जादूही विलक्षण आहे
मृगाचा पहिला पाऊस असा काही जमिनीत भिनतो
ओल्या मातीचा गंध मग मनाला धुंद करतो
धरतीच्या कुपीतील मृद्गंध
थेंब स्पर्शाने सर्वत्र दरवळतो
तप्त झालेल्या धरणीवर बघा कसा पाऊस हा स्वच्छंद बरसतो
कधी बेधुंद कोसळणारा कधी रिमझिम बरसून बेभान करणारा हा पाऊस मरगळलेल्या मनाला
नवी पालवी येऊन चैतन्य फुलवितो
कुठे रुसून बसणारा तर कुठे आनंदाने बरसणारा
कधी दुःखाचे चटके तर कधी हर्ष उत्साह घेऊन येणारा पाऊस मना मनाला शांतता आनंद देऊन जातो मृद्गंध पावसाचा धुंद करितो
प्रत्येक पाऊस काहीतरी वेगळेपण घेऊन येतो
परंतु रणरणत्या उन्हानंतर सृष्टीत सौंदर्य निर्माण पाऊसच करतो
पाऊस बरसून गेल्यावर मन नाचते मग ओल्यावरती
हसती पक्षी, हसती झाडे-वेली साद घालिते ही ओली धरती...
