मृदगंध पावसाचा
मृदगंध पावसाचा
1 min
269
मृदगंध पावसाचा
एक सुखद अंकुर ।
चोहीकडे जाता लक्ष
उत्सुकता माना फार॥१॥
भुमीवर पांघरली
शालुरुपी हिरवळ।
सर्व सुंगध फुलांचा
श्वासामधे दरवळ ॥२॥
मोर ससे पक्षी प्राणी
सारेजण आनंदले।
किती मधाळ पर्वणी
रान वन बहरले॥३॥
पाणीदार जलमोती
देती भेट जमिनीला
इंद्रधनुष्याचा रंग।
भिडणारा आकाशाला॥४॥
सार्या जगाचा पोशिंदा
अन्नधान्य काळजीला।
पिक अंकुर पाहुन
आनंदाने सुखावला॥५॥
प्रत्येकाची आशा भुक
पावसाने धन्य झाली
मृदगंध प्रत्यक्षात
पाहूणच भारावली॥६॥
