STORYMIRROR

Suvarna Thombare

Others

3  

Suvarna Thombare

Others

मृद्गंध पावसाचा

मृद्गंध पावसाचा

1 min
168

हिरवा शालू नेसूनी

नववधू पहा ही सजली

प्रियकर भेटता हर्षित

वसुंधरा ही लाजली.


गीष्माच्या सोसूनी झळा

करपली पहा धरती

दाह शमविण्या आर्जव

वरूनास ती करती.


मिलणास आतूर वरून

सत्वर धाव भू वरी घेई

काळ्या ढगांनी पहा

मेघ दाटून येई.


धो धो कोसळती पाऊसधारा

 मृदगंध पावसात सुटला

त्या गंधाने मनमोहूनी

प्रेमरसात जीव डुंबला.


धरणीमाता तृप्त होऊनी

हिरवा साज ल्याली

नवचैतन्याची लहर पहा

जीवनी माझ्या आली.


Rate this content
Log in