मृद्गंध पावसाचा
मृद्गंध पावसाचा
1 min
184
थेंब आठवांचे
पाऊस बनून आले
चिंब भिजवून
सैरभैर करून गेले
भाव मनातले
मनातच नाचू लागले
तुटक्या स्वप्नांना
अलवार सांधू लागले
घननिळ्या मेघांनी
कैक प्रश्नांना खुणावले
बरसणाऱ्या सरींनी
उत्तरांना मात्र सुनावले
भिजलेल्या तनाचे
मनाशी नाते जुळले
समीकरण पावसाचे
कोणाही ना कळले
हरेक थेंबांचे
गीत मला उमजले
मनसुबे सख्याचे
न बोलताच समजले
