-मराठीची थोरवी-
-मराठीची थोरवी-
काय वर्णु माझ्या मराठीची थोरवी
उच्चारता वाटे सहत्स्त्रकरू झळाळी
मधाळ शब्द चाखता असा
जिभा ओतती लाळा
वाटे स्वर्गीचे अमृत भूवरी पातले
भाग्य आमचे फळा आले
अंतरी भावना उफाळू पहाते
कलह मनाचा क्षणीच शांत होते
ताकद या मराठीची धार भाषेत आहे
शस्त्रावीनाही छेद जीवा करते
चातक श्रोता ऐकण्या आतुर
थेंब मराठीचा भागवतो तहान
गाता मराठी सप्तसूर आळवती
तालवाद्य मंत्रमुग्ध अप्सरा नाचती
सुवासिक भाषा मायबोलीत आहे
जसा समरस पुष्प गंधात आहे
पारणे डोळ्याचेे फिटे पाहता
वेलांटी उकाराचा साज देखना
संतवाणी उच्चारली अभंग ओवी
भक्तीत नाहली माय मराठी
कवी लेेखक गुरु शिष्य सर्व नमती
सरस्वती जननी तर गणेश वरदहस्ती
