मराठीचा साज
मराठीचा साज
1 min
203
माय मराठी आपुली
आहे लाखात देखणी
जन्मा आलो धन्य झालो
सह्यादीच्या या अंगणी
माझ्या मराठी भाषेचे
गुणगान वारा गातो
वाणी ऐकता मधाळ
जीव धन्य त्याचा होतो
मराठीचा आभिमान
येथे लहान थोरांना
भाषा लावियेते लळा
तिच्या लाडक्या पोरांना
असो संस्कृत प्राकृत
शाखा तिच्या शानदार
मुखी मराठी रुळता
स्वर लागे बाणेदार
सप्त सागरा पल्याड
गर्जा मराठीचा बाज
पैंजा अप्सरांसी जिंके
असा मराठीचा साज
