मराठीचा गौरव
मराठीचा गौरव
1 min
401
मराठी मातीत जन्म घेतला
गिरवितो मातृभाषेचे धडे
ज्ञानामृत प्राशूनी मायेचे
मराठी पाऊल पडते पुढे
कर्णावरती संस्कार मराठी
जन्मापासून घडत राहिला
मुखामधूनी पहिलाच स्वर
मराठीत अभिव्यक्त जाहला
मातृभाषेचे सौंदर्य देखणे
हळूहळू हे उलगडत गेले
मातृभाषेचा लळा लागता
मन माझे मराठमोळे झाले
माय मराठी माझी भाषा
करतो तिला त्रिवार वंदन
महाराष्ट्राच्या भूमीत फुलावे
साहित्याचे अनोखे नंदनवन
जगतामध्ये सदैव गुजू दे
मराठी भाषेचे गौरव गान
मराठमोळ्या राज्यभाषेचा
मराठी माणसाला अभिमान
